आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले लावारिस असतात – भाजप प्रवक्ते अवधूत वाघमुंबई: भाजप प्रवक्ते अवधूत वाघ पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत. अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा अनाथ असा उल्लेख केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात असं अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. ट्विट अकाउंटवर एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी हे वादग्रस्त विधान केले.चौकीदार अवधूत वाघ नावाने त्यांचं ट्विटर अकाऊंट असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे कि, “आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा… हागणारा नाही तर बघणारा लाजतो.”मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी खालच्या पातळीवर जात शेतकऱ्यांच्या मुलांवर वादग्रस्त वक्तव्य केले. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला अवधूत वाघ यांनी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा…’, असे उत्तर दिले. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. हे ट्विट नंतर काढण्यात आले आहे.
