बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील – मनसे
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर ट्विटरच्या माध्यमातून खोचक टीका केली होती. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे असं ट्विट आशिष शेलार यांनी काल केलं होतं. या ट्विटला मनसेने आपल्या अधिकृत ट्विट हॅण्डलवरून प्रतिउत्तर दिलं आहे.
मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर…चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर…त्रिफळा उडवू मोदी शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील काळजी नका करू शेलार भाऊ
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील #हुकलेलं मंत्रिपद असे ट्विट करत आशिष शेलार यांच्या ट्विटला मनसेने उत्तर दिलं आहे.
मनसेच्या या ट्विटला आशिष शेलार कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणे गंमतीशीर ठरणार आहे.
मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर…
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर…
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा,
गोलाकार खेळाडू तुमचे थकतील…
काळजी करू नका शेलार भाऊ,
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील…#हुकलेलंमंत्रिपद— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 28, 2019
