Anand Teltumbade
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे नक्षलवादी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केले.
डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारल्यानंतर आज पहाटे साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई विमानतळावर शुक्रवारी मध्यरात्री च्या वेळेस डॉ. आनंद तेलतुंबडे पोहोचणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पुणे पोलीस रात्रीच मुंबई विमानतळावर आपला तळ ठोकून होते. तेलतुंबडे मुंबई विमानतळावर पोहचताच पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पुणे न्यायालयात डॉ. आनंद तेलतुंबडे यांना आज हजर करण्यात येणार आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी एल्गार परिषद कारणीभूत होती त्यामध्ये आनंद तेलतुंबडे यांना सहभाग होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
