‘येस’ बँकेच्या ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून रिर्झव बँक लवकरच यावर तोडगा काढेल अशी सरकारची ग्वाही
येस बँकेतल्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून या पेच प्रसंगावर रिझर्व बँक लवकरच तोडगा काढेल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे.
रिझर्व बँकेचा पुनर्रचना आराखडा येत्या ३० दिवसात लागू करण्यात येईल असं त्यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यामांना सांगितलं. येस बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एका वर्षाचे पगार आणि ठेवी, तसंच देणी यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
२०१७ पासूनचं सरकारचं येस बँकेवर लक्ष होतं आणि त्याबाबत वेळोवेळी नोटीसा जारी करण्यात आल्या होत्या असं त्या म्हणाल्या. बँकेच्या व्यवस्थापनात गैरप्रकार होत असल्याचं चौकशी यंत्रणांना आढळल्यावरुन संबंधितांची कसून चौकशी करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितली.
