चिंतादायक: यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव झाला आहे. आर्णी तालुक्यातल्या खंडाळा जंगलात गेल्या आठवड्यात 8 मोर मृतं आढळले होते. या मृतं मोरांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं. मोरांना बर्डफ्ल्यू ची बाधा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात लिंगटी इथं जवळपास ५०० कोंबड्या, तर खैरी इथं दिडशेच्या वर कोंबड्या दगावल्या असून त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हा प्रशासनानं या गावात अॅलर्ट झोन जाहीर केला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात माहूर तालूक्याच्या पापलवाडी शिवारात मृत्यू झालेल्या चार कोंबड्या आणि तीन कावळ्यांना बर्डफ्ल्यूचीच लागण झाल्याचा अहवाल आल्यानं, पापलवाडी परिसरात दहा किलोमीटर क्षेत्र सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
