Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दिव्यांगांसाठी पदांच्या भरतीचे आदेश

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दिव्यांगांसाठी पदांच्या भरतीचे आदेश

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये दिव्यांगांसाठीच्या ३ हजार ५६६ पदांच्या भरतीचे आदेश काढले आहेत.

दिव्यांग व्यक्ती अधिकार कायद्याअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. यात १ हजार ४६ अ वर्गातील, ५१५ ब वर्गातील, १ हजार ७२४ क वर्गातील आणि २८१ ड वर्गातील पदांचा समावेश आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं दिली आहे.

पात्र दिव्यांगांमध्ये ऍसिड हल्ल्यात जखमी झालेले, स्वमग्न, विशिष्ट शैक्षणिक अक्षमता, मानसिक आजार, बहुविकलांगता, शारीरिक वाढ खुंटलेले तसेच स्नायू विकृती उद्भवलेल्या व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *