Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नवनिर्वाचित अध्यक्षांसह भारतीय कुस्ती महासंघाचं निलंबन

अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नवनिर्वाचित अध्यक्षांसह भारतीय कुस्ती महासंघाचं निलंबन

नवी दिल्ली, दि. २४: केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह महासंघाचं निलंबन केलं आहे. महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी निवडून येताच १५ आणि २० वर्षांखालच्या वयोगटासाठीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धा उत्तरप्रदेशात गोंडा मधल्या नंदिनी नगर इथं होतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र ही घोषणा महासंघाच्या घटनेतील तरतुदी आणि नियमांना धरून नव्हती, स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नियमांप्रमाणे तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नव्हता, त्यामुळे निलंबनाची कारवाई केल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे.

महासंघाच्या कार्यकारी समितीनं अशा स्पर्धांचे निर्णय घेणं अपेक्षीत आहे, आणि त्याआधी संबंधीत प्रस्तावही विचारार्थ घेणं अपेक्षीत आहे, मात्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी क्रीडा नियमांना बगल देत हा निर्णय घेतला, त्यातून महासंघ अजूनही या आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असल्याचं दिसतं असंही या वृत्तात म्हटलं आहे. क्रीडा मंत्रालयानं पुढच्या आदेशापर्यंत महासंघाला आपलं काम स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाच्या कारभाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यासाठी तदर्थ समिती स्थापन करण्याची विनंती सरकारनं आयओए, अर्थात भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *