वरळी नाका इथल्या शिवसेना शाखेत नववर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन
वरळी: वरळी नाका इथल्या शिवसेना शाखेत नववर्ष रक्तदान शिबिरानं साजरं होणार आहे. मुंबई महापालिकेचे नामनिर्देशित नगरसेवक अरविंद भोसले यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे.
शिबिराला महापालिकेच्या नायर रुग्णालय रक्तपेढीचं सहकार्य लाभणार आहे. ३१ डिसेंबरला रात्री ११:०० ते मध्यरात्री १:०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे.
(क्रेडिट-AIR)
