मध्यवर्ती भांडारात गहू आणि धानाचा एकत्रित साठा ५७९ एलएमटीपेक्षा अधिक
सध्याच्या गहू खरेदी दरम्यान हमीभावाने केलेल्या ४७,००० कोटी रुपयांच्या खरेदीने २१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा
चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) २०२३-२४ दरम्यान गहू खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. चालू हंगामात गव्हाची खरेदी उत्तरोत्तर वाढत असून ३०.०५.२०२३ पर्यंत ही खरेदी २६२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) झाली आहे, सध्याच्या गहू खरेदीने गतवर्षीच्या एकूण १८८ एलएमटी खरेदीला ७४ एलएमटीने मागे टाकत हा टप्पा गाठला आहे. सध्याच्या गहू खरेदी दरम्यान हमीभावाने केलेल्या ४७,००० कोटी रुपयांच्या गहू खरेदीने २१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंजाब, मध्य प्रदेश आणि हरयाणा या तीन राज्यांचा अनुक्रमे १२१.२७ एलएमटी, ७०.९८ एलएमटीआणि ६३.१७ एलएमटीच्या खरेदीसह गहू खरेदीत मोठा वाटा आहे.
अवकाळी पावसाचा परिणाम गव्हावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गव्हाच्या गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांमध्ये भारत सरकारने दिलेली शिथिलता; गाव/पंचायत स्तरावर सुरु केलेली खरेदी केंद्रे; सहकारी संस्था/ ग्रामपंचायती/ अडते इत्यादी मार्फत खरेदी त्याचप्रमाणे जास्तीत जास्त गहू उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या नियुक्त खरेदी केंद्रांव्यतिरिक्त खरेदी प्रक्रिया करताना एफपीओना संलग्न करण्याची दिलेली परवानगी हे या वर्षीच्या निकोप खरेदीत महत्त्वाचे योगदान देणारे घटक आहेत.
धान खरेदीही सुरळीत सुरू आहे. खरीप विपणन हंगाम (केएमएस) २०२२-२३ मध्ये खरीप पिकाच्या खरेदी दरम्यान ३०.०५.२०२३ पर्यंत ३८५ एलएमटी धान खरेदी करण्यात आले असून अजून ११० एमएमटी धानाची खरेदी बाकी आहे. खरीप विपणन हंगाम २०२२-२३ मध्ये रब्बी पिकाच्या खरेदी दरम्यान १०६ एलएमटी धान खरेदी करण्याचा अंदाज आहे.
मध्यवर्ती भांडारामध्ये गहू आणि धानाचा यांचा एकत्रित साठा ५७९ एलएमटी (गहू ३१२ एलएमटी आणि तांदूळ २६७ एलएमटी) पेक्षा अधिक आहे यामुळे देशाच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देश सुस्थितीत आहे असे सरकारचे म्हणणे आहे.
