Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

राष्ट्रीय युवा दिनाच्या दिल्या शुभेच्छा

स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे विश्वदूत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केले आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्षा निवासस्थानी  जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी हिंदू संस्कृती आणि सभ्यता जगभरात पोहोचविण्यासाठी संपूर्ण जीवनच समर्पित केले. आचार, विचार, व्यवहार याबाबत त्यांनी सहज सोप्या भाषेत आणि तितक्याच स्पष्टपणे मांडणी केली. ही मांडणी आजच्या युवा पिढीसह येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारी ठरेल अशीच आहे. भारतीय संस्कृती आणि त्यातही हिंदू संस्कृती, सभ्यता जगभरात पोहोचविण्यासाठी ते भारताचे विश्वदूत होते आणि यापुढेही राहतील. त्यांचे विचार आणि जीवन हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही विविध कार्यक्रम, उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा.

स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *