सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर विनोद पाटील म्हणाले, “समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि भयानक क्षण”
मुंबई, दि.५: बहुप्रतिक्षित मराठा आरक्षणासंबंधी निकालाची सुनावणी आज अखेर सर्वोच्च न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारने बनवलेल्या मराठा आरक्षण कायद्याला ऍड. सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर आज न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने एकत्रित निर्णय देत हे आरक्षण रद्द केले आहे.
आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा मोर्चा चे समन्वयक विनोद पाटील म्हणाले की, “माझ्यासाठी आणि मराठा समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि भयानक क्षण आहे.” पुढे ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बोलायचं नाही, पण हा निर्णय दुर्दैवी आहे. याचा परिणाम संपूर्ण तरुण पिढीवर होणार आहे. सविस्तर ऑर्डर आल्यानंतर वकिलांशी चर्चा करून समाजाच्या, तरुणांच्या वतीने पुढील निर्णय घेतला जाईल.”
या निकालावर राज्य सरकारने ही आपलं मत व्यक्त केलं आहे.
