Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बॉम्बे चे मुंबई’ असं नामकरण करण्यात मी पुढाकार घेतला” – छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

४ मे १९९५ रोजी शिवसेना-भाजप चे राज्यात सरकार असताना बॉम्बे चे मुंबई असे अधिकृतरित्या नामकरण करण्यात आले. परंतू याची सुरुवात ही एक तपापूर्वी सुरू झाली होती. त्यावेळी सध्या राज्यसरकार मध्ये कॅबिनेट मंत्री असलेले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यावेळी ते शिवसेनेचे नेते व मुंबईचे महापौर होते.

या साऱ्याची आठवण काढत छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना फेसबूक पोस्ट च्या माध्यमातून उजाळा दिला आहे. वाचा नेमकं काय म्हणाले आहेत छगन भुजबळ

शिवसेनेचा महापौर आणि आमदार अशी दोन्ही पदं मी भूषविली. सुंदर मुंबई मराठी मुंबई ही घोषणा देऊन त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ अवघ्या ३३ दिवसात उद्यान शिल्प उभारले. प्रविण काटवींनी त्यांचं डिझाइन केलं. त्याचा पाया देखील मजबूत असा आहे.
“२६ जानेवारी १९८६ रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बॉम्बे चे मुंबई’ असं नामकरण करण्यात मी पुढाकार घेतला. या नामकरण समारंभास सर्व पक्षाचे नेते आणि विविध भाषिक उपस्थित होते. आणि सर्वांनी त्यावेळी आम्ही यापूढे बॉम्बेचा उल्लेख मुंबई असाच करणार असा निर्धार केला.”

यामुळे मुंबईवर मराठीचा ठसा उमटला. मराठीचा हा ठसा कायम उमटला जावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठी भाषेतून सुरू झाला. सुंदर मुंबई- स्वच्छ मुंबई या घोषणेअंतर्गत मुंबईतील सर्व ट्राफीक आयलंड सुंदर आणि हिरवीगार करण्याचं काम १९८६ साली विविध कंपन्यांना त्यांचा लोगो वापरण्याच्या अनुमतीसह दिलं ही संकल्पना त्यावेळी मुंबईत नवीनच होती.

त्यानंतर युतीची सत्ता असताना ४ मे १९९५ ला महाराष्ट्र सरकारने “बॉम्बे चे मुंबई” असे नामकरण केले.

फोटो सौजन्य – फेसबुक

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *