“माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध” – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आ. विद्या चव्हाण यांचा दावा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने छळवणुकीची तक्रार दाखल केली व यानंतर मोठी खळबळ उडाली. या संदर्भात एका वृत्तपत्राला स्पष्टीकरण देताना त्यांनी मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या कि त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला त्यांच्या सुनेच्या मोबाईल मधील व्हाट्सएप्प चॅट मध्ये या बाबतचे पुरावे सापडले. यानंतर दोघांनी सामोपचाराने घटस्फोट घेण्याचे ठरविले व सध्या सदर प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी आमदार विद्या चव्हाण यांनी आपण आपल्या सुनेला सुनेप्रमाणे वागणूक दिल्याचेहि नमूद केले. या प्रकरणी वकिलाची फूस असण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या.
