Video : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात उघड प्रचार
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधील महत्वाच्या लढतीपैकी एक असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यामध्ये ही लढत होणार आहे.
या निवडणुकीची विशेष बाब म्हणजे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या प्रचारासाठी चक्क देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी मैदानात उतरले आहेत. देवरा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी देवरांची स्तृती करताना दिसत आहेत. ‘दक्षिण मुंबईसाठी मिलिंदच सर्वोत्तम आहे’ असे मत अंबानी यांनी या व्हिडीओत मांडले आहे.
या व्हिडीओ मध्ये रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, लघुउद्योजक क्रिश रामणानी, कोटक ग्रुपचे उदय कोटक, किराणामालचे व्यावसायिक, दुध डेअरीचे मालक तसेच पानाची टपरी चालवणारा व्यापारी अशा लोकांनी मते मांडली आहेत.
यामध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी ‘मलिंदने १० वर्ष दक्षिण मुंबईचे नेतृत्व केले आहे. मलिंदला दक्षिण मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सखोल ज्ञान आहे,’ असे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना मुंबईमधील छोट्या तसेच मोठ्या उद्योगांनी मुंबईची भरभराट झाली असल्याने आपण अधिक तरुण लोकांना येथे नोकऱ्यांची संधी देण्याची गरज असल्याचे अबांनी म्हणाले आहेत. मुकेश अंबानी हे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात पण दक्षिण मुंबई मतदारसंघात त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद देसाई यांच्या विरोधात भूमिका घेत मिलिंद देवरा यांची स्तुती केल्या मुळे साऱ्यांच्याच भुवया वर झाल्या आहेत.
From small shopkeepers to large industrialists – for everyone, South Mumbai means business.
We need to bring businesses back to Mumbai and make job creation for our youth a top priority.#MumbaiKaConnection pic.twitter.com/d4xJnvhyKr
— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) April 17, 2019
