Video : अरे क्षुद्रा जागा हो – जितेंद्र आव्हाड
मुंबई: आपल्या आक्रमक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज सोशल मीडियाच्या मध्यामातुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
साळी, कोळी, तेली, तांबोळी,आगरी, धनगर, माळी, वंजारी, कुंभार, गोसावी ह्या शिवरायांना साथ देणाऱ्या अठरा पगड जातींची मनुवादी माती करणार आहेत, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर केली आहे.
मंडळ आयोगाने दिलेले अधिकार चौकीदार नवीन आयोग नेमून ते अधिकार रद्द करण्याचा प्रयत्न करतोय. अरे क्षुद्रा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो…असे आवाहन त्यांनी राज्यातील केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर भाजप कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.
अरे क्षुद्रा जागा हो
परिवर्तनाचा धागा हो
मंडल आयोगाने दिले अधिकार
रद्द करतोय नवीन आयोग नेमून #चौकीदार
साळी
कोळी
तेली
तांबोळी
आगरी
धनगर
माळी
वंजारी
कुंभार
गोसावी
ह्या शिवरायांना साथ देणाऱ्या अठरा पगगड जाती
मनुवादी करणार माती pic.twitter.com/UWDDv2oDMy— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2019
