Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वरूण धवनचा आज ३२वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या चित्रपटांबद्दल

वरूण धवनचा आज ३२वा वाढदिवस, जाणून घ्या त्याच्या चित्रपटांबद्दल

वरूण धवनचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी मुंबईत झाला. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि लाली धवन यांचा मुलगा हीच वरूण धवनची ओळख नाही. तर आजघडीला नव्या पिढीचा सुपरस्टार अशी वरूणची नवी ओळख आहे. ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली. एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देत, ए लिस्ट स्टार्समध्ये स्वत:चे नाव नोंदवले.

वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट कारकीर्द:

१) २०१२- स्टुडन्ट ऑफ द इयर
२) २०१४- मैं तेरा हिरो
३) २०१४- हम्प्टी शर्मा की दुल्हनिया
४) २०१५- बदलापूर
५) २०१५- ABCD २
६) २०१५- दिलवाले
७) २०१६- ढीशूम
८) २०१७- बद्रीनाथ कि दुल्हनिया
९) २०१७- जुडवा २
१०) २०१८- ऑक्टोबर
११) २०१८- सुई धागा
१२) २०१९- कलंक

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *