Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांत आज कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांत आज कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

मुंबई, दि.८: राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोविड लसीकरणासाठीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांत तीन तर महापालिका हद्दीत एका आरोग्य संस्थेत ही रंगीत तालीम घेतली जाईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
याआधी २ जानेवारीला राज्यात पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यांमधे ही मोहीम यशस्वीपणे राबवली होती. क्षेत्रीय स्तरावर कोवीन अॅपची उपयोगिता तपासणं, लसीकरणाबाबतचं नियोजन, अंमलबजावणी आणि अहवाल तयार करणं, या सर्व बाबींची पडताळणी करणं, प्रत्यक्ष लसीकरणापूर्वी लसीकरणादरम्यानची आव्हानं जाणून घेत त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणं आणि लसीकरण मोहिमेतल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशानं, ही रंगीत तालीम घेतली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून यासंदर्भात काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आलं. या मोहिमेत एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांचं अभिरुप लसीकरण केलं जाईल. कोवीन अॅपवरच्या नोंदणीनुसार लाभार्थ्यांना कक्षात सोडलं जाईल. लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरण माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये केली जाईल, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *