केजरीवाल दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत येणार आहेत
मुंबई, दि. २२: अरविंद केजरीवाल बुधवारी, २४ मे २०२३ रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल यांनी राज्यसभेत भाजपला एकाकी पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार केजरीवाल दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत येणार आहेत. या भेटीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत येणार असून या दौऱ्यात महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकारण आणि भाजपची अन्य पक्षांशी असलेली कोंडी या मुद्द्यांवर लक्ष दिले जाणार आहे.
गुरुवार, २५ मे रोजी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. ही बैठक मातोश्री आणि सिल्व्हर ओक येथे होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. लोकशाहीचा ऱ्हास करणाऱ्या भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
