प्रचारासाठी उर्मिला मातोंडकरनं चालवली रिक्षा
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून मुंबई उत्तरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिलानं मुंबईत प्रचाराला अनोख्या पद्धतीने सुरुवात केली आहे. सध्या ती गोराई परिसरात चक्क रिक्षा चालवत लोकांना मतदान करण्याची विनंती करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उर्मिलाने आज रिक्षा चालकांची भेट घेतली आणि त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं. तिनं रिक्षा चालवत आसपासच्या लोकांनाही मतदान करण्यास विनंती केली. उर्मिलानं स्वत: हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘तुम्हाला रिक्षातून कुठं सोडायचंय का? रिक्षा चालक आपल्या मुंबईची लाईफलाईन आहे. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला’ असंही तिनं फोटोसोबत लिहिलंय.
