Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण-पनवेल मार्गावर बस थांबे उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

उरण-पनवेल मार्गावर बस थांबे उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

उरण, दि.१५(विठ्ठल ममताबादे): उरण-पनवेल मार्गावर सिडको कार्यालया जवळील मुख्य रस्त्यावर असलेले पूल खराब व धोकादायक झाल्याने ह्या मार्गांवरील वाहनांना दुसऱ्या मार्गाने जाण्यास प्रशासनाने सांगितले आहे. या धोकादायक पुलामुळे अवजड वाहने तसेच महामंडळच्या प्रवासी बसेस, नवी मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक उपक्रमाच्या बस (NMMT) ह्यांना या मार्गांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व वाहनांची वाहतूक व्यवस्था द्रोणागिरी नोड मधून भेंडखळ मार्गे उरण-पनवेल मुख्य रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. नवीन मार्ग असल्याने ह्या मार्गांवर बस थांबेच नाहीत. उरण मधून द्रोणागिरी मार्गे पनवेल, वाशीला जाताना मध्ये कुठेच बस थांबा नसल्याने बस थांबत नाहीत त्यामुळे नोकरदार, व्यापारी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे.

बसच थांबत नसल्याने नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेतर्फे शाखाप्रमुख जगजीवन भोईर यांनी उमा इम्पिरिअल इमारत सेक्टर ४८, रिद्धी सिद्धी इमारत सेक्टर ५०, देवकृपा इमारत सेक्टर ५१, MSEB चौक, हिंदमाता टर्मिनल, भेंडखळ गाव या ठिकाणावर बस थांबा लावण्यात यावेत अशी मागणी महामंडळ बस आगार, NMMT(नवी मुंबई महानगर पालिका) बस प्रशासन, कार्यकारी अभियंता सिडको विभाग यांच्याकडे पत्रव्यवहारा द्वारे केली आहे. सदर ठिकाणांवर त्वरित बस थांबे उभारण्यात यावेत. जेणेकरून चालक, वाहक, प्रवाशांना माहिती मिळेल व सर्वांचाच प्रवास सुखाचा होईल अशी मागणी जगजीवन भोईर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *