Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील आदिवासींना करण्यात आले विविध दाखल्यांचे वाटप

उरण तालुक्यातील आदिवासींना करण्यात आले विविध दाखल्यांचे वाटप

उरण, दि.५(विठ्ठल ममताबादे): उपविभागीय अधिकारी राहुल मूंडके, तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण, अहेर राव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील १११८ जातीचे दाखले, ६०० नवीन रेशन कार्ड, ७०० रेशन कार्ड अद्ययावत करणे, १००० आधार कार्ड, १००० बँक पास बुक, २०० मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले. २५ महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगून त्यांना सदर शस्त्रक्रिया करण्या साठी मदत केली. अशा अनेक प्रकारे आदिवासी बांधवांची आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून मेहनत घेण्यात आली. संदीप म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूणाडे आदिवासी वाडी वरील सर्व लहान मुलांना चॉकलेट चे वाटप करण्यात आले. तसेच उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या हस्ते वाडी वरील सर्वांना जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

दिनांक ३/११/२०२१ रोजी चिरनेर येथील केल्याचा माळ येथे आणि दिनांक ०२/११/२०२१ रोजी मांगिर देव भवरा उरण येथे जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. पुढील काही दिवसात उरण तालुक्यातील सर्व वाड्यांवर तयार झालेल्या जातीच्या दाखल्यांचे वाटप होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील राहिलेल्या आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले तयार करण्यासाठी कॅम्प घेतले जाणार आहेत आणि त्याच बरोबर पनवेल तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढण्यासाठी दिनांक १५/११/२०२१ पासून कॅम्प सुरू करायचे आहेत असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. सदर जातीचे वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते तथा उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, संदीप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि प्रा. राजेंद्र मढवी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *