Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाने जपली रक्तदान शिबीराची परंपरा

उरण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाने जपली रक्तदान शिबीराची परंपरा

उरण, दि.२५(विठ्ठल ममताबादे): शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे तर्फे दरवर्षी विविध अध्यात्म, संस्कृती, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. हे मंडळ गेली १८ वर्षे साखर चौथच्या दिनी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करीत आलं आहे. केवळ मौजमजा करमणूक म्हणून बाप्पाची स्थापना न करता प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम राबवले पाहिजे या उद्देशाने गेली १८ वर्षे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले आहे. मंडळ जवळपास ७ वर्षे नियमित राबवित असलेला उपक्रम आणि सध्याच्या कोरोना काळात ज्याची नितांत गरज आहे असा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर.

यावर्षीही शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ३ या वेळेत श्री काशीनगर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, पागोटे, तालुका उरण या ठिकाणी सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इच्छुक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिरात रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी सामाजिक, राजकीय व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *