Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण क्षेत्रातील करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित

उरण क्षेत्रातील करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित

उरण : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात लॉकडाऊन कालावधी दि.०३ मे २०२० रोजीच्या रात्री १२.०० पासून ते दि.१७ मे २०२० रोजीच्या रात्री १२.०० वा. पर्यंत लागू करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निधी चौधरी यांनी संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित केला असून रेड झोन साठीचे सर्व निर्देश संपूर्ण उरण तालुक्याच्या क्षेत्रासाठी लागू राहतील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *