Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केरळ येथील चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स मध्ये उरण येथील ‘योगा विथ पूनम ग्रुप’च्या खेळाडूंचे सुयश

केरळ येथील चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स मध्ये उरण येथील ‘योगा विथ पूनम ग्रुप’च्या खेळाडूंचे सुयश

उरण, दि. २८(विठ्ठल ममताबादे): चौथी ऍथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे १८ मे ते २२ मे २०२२ या दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत भारताचे प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विविध राज्यातील तब्बल ५५०० खेळाडूंनी यात सहभाग घेतले होते. या स्पर्धेत योगा विथ पूनम उरण च्या योग शिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावून सुयश प्राप्त केले आहे. शिक्षक राम चौहान यांनी गोळा फेक तृतीय क्रमांक व भालाफेक तृतीय क्रमांक पटकविला आहे. राम चौहान हे उरण एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल उरण येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

योग शिक्षिका पुनम चौहान यांनी १० किलो मीटर धावणे प्रथम क्रमांक तर १५०० मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला आहे. पूनम चौहान या उत्तम योग शिक्षिका आहेत. अशा प्रकारे सुयश प्राप्त केलेल्या या उरण मधील दोन्ही शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *