Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रत्नवेध उरण या संस्थेतर्फे उरण मध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन

रत्नवेध उरण या संस्थेतर्फे उरण मध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन

उरण, दि. १६(विठ्ठल ममताबादे): नाट्य प्रशिक्षणातून बाळ गोपाळांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी जेष्ठ दिग्दर्शक विनायक सावर्डेकर आणि इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उरण मध्ये लहान मुलांसाठी प्रथमच रत्नवेध उरण या संस्थेतर्फे दिनांक ८ मे २०२२ ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात वाचन, भाव, भाषा, उच्चार, अभिनय याची ओळख तसेच रंग मंचावरील वावर, वापर तसेच योग्य माहिती, रंगभूषा व वेशभूषा याची ओळख, व्यक्तिमत्व विकास, मान्यवरांमार्फत योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरार्थीला संस्थेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी आनंद ठक्कर – 8879045007, सुषमा काळे – 8291446203, प्रतीक्षा जोशी – 8097801168, रामचंद्र निपाणीकर – 9167603550 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन रत्नवेध उरण या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *