यू.पी.एस. मदान राज्याचे नवे मुख्य सचिव
राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर वित्त विभागाचे विद्यमान सचिव यूपीएस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची लोकपाल सदस्य म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर या रिक्त पदासाठी मदान यांचे नाव सुचविण्यात आले. मदान हे जैन यांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
मदान हे १९८३च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते वित्त विभागाचे सचिव होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणात त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे.
