Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित

सर्वच मागण्यांच्या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा

उरण, दि. २८(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदुर संघ) महावितरण वाशी मंडळ तर्फे विविध मागण्यांसंदर्भात पनवेल खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आज दिनांक २८/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. मात्र दुपारी १२:३० ते २:३० दरम्यान कामगार उपआयुक्त पनवेल, रायगड या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी, महावितरणचे कंत्राटी कामगार, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यात विविध विषयावर चर्चा झाली. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी, वाशी विभागाचे मॅनेजर जयश्री मराडे, पनवेल एमएसईबी डेप्युटी मॅनेजर सचिन घोडेकर, मे. ऑल ग्लोबल सर्विस प्रा. ली. या एजेन्सीचे प्रतिनिधी प्रशांत देठे, रोहित परब, नरेश मखीजा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश अणेराव, रायगड जिल्हा सचिव कमाल खान, पनवेल सिटी कोषाध्यक्ष कल्पेश म्हात्रे, कामगार बाळकृष्ण ठाकूर, खांदेश्वर गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी सलीम तळवी आदी उपस्थित होते.

कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांनी ठेकेदारांना व ठेकेदार प्रतीनिधींना विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी कामगारांच्या समस्या त्वरित सोडविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार प्रतीनिधींना केल्या. सचिन मेंगाळे, उमेश अनेराव यांनी कामगारांच्या विविध समस्यांवर उत्तमरित्या, भक्कमपणे बाजू मांडली. यावेळी ठेकेदारांनी सर्व सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन दिले. तसे त्यांनी मिटिंग मध्ये झालेल्या विषयांवर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. कामगारांना यापुढे कोणताही त्रास होणार नाही अशी हमी ठेकेदारांनी दिली. विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याने सदर बेमुदत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले. वाशी मंडळ अंतर्गत ५१२ कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी सदर उपोषण स्थळी १५० कंत्राटी कामगार उपस्थित होते.

संघटनेच्या प्रमुख मागण्या(कामगारांच्या प्रमुख मागण्या

१) मे. ऑल ग्लोबल सर्व्हिस प्रा. लि. या एजन्सीचे लायसन्स रद्द करून सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे

२) दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी

३) न्यायालयीन संरक्षित कामगारांना पुन्हा त्वरित कामावर घेण्यात यावे

४) अशोक अखाडे या ठेकेदाराच्या सुरक्षा ठेव मधून महावितरण ने कामगारांचे राहिलेले थकीत वेतन व बोनस देणे

५) जय दत्त एजंसीच्या सुरक्षा ठेव मधून महावितरण ने कामगारांचे राहिलेले पगार व फरक देणे

६) अपघात झालेल्या कामगारांना व त्यांच्या परिवारांना त्वरित मेडिकल भरपाई व पेन्शन लागू करणे

७) सर्व कंत्राटी कामगारांचे एकाच दिवशी पगार झाले पाहिजे

८) परिपत्रक ५३६ एमएमआरडीए झोन चे पालन करून समान काम समान वेतन व बोनस परिपत्रक ची अंमलबजावणी करणे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *