Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुलुंड आयटीआय येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन

मुलुंड आयटीआय येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, दि. २९ : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २९ व ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी २९ व ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.०० या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजतंत्री इमारत, पहिला माळा, मुलुंड येथे खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य एस. एस. गोरे यांनी  केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *