भाजपनेत्या उमा भारती म्हणाल्या ‘छत्रपती मोदी झिंदाबाद’; मोदींच्या शिवरायांशी झालेल्या तुलनेमुळे शिवप्रेमींमध्ये संताप
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी भगवान गोयल नावाच्या भाजपच्या एका नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे एक पुस्तक प्रकाशित केले होते. यानंतर मोठा वादंग उभा राहिला. पण आज या सर्वांवर कडी झाली व ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली.
आज दिल्ली निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही ट्विट केले ज्यातल्या एका ट्विट मध्ये त्यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना शेवटी छत्रपती मोदी झिंदाबाद असे म्हटले आहे. यानंतर शिवप्रेमी ट्विटराईट ने त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका केली.
आता याचे नेमके कोणते राजकीय पडसाद उमटतात ते पाहणे लक्षणीय ठरेल.
3. पूरे देश की जनता मोदी जी को तथा मोदी जी पूरे देश की जनता को आत्मसात कर चुके हैं। छत्रपति मोदी जिन्दाबाद।
— Uma Bharti (मोदी का परिवार) (@umasribharti) February 11, 2020