शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव तर शिंदे गट उच्च न्यायालयात
मुंबई, दि. १५: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात, तर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १४ आमदारांना अपात्र ठरवलं नाही. या निर्णयाला भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत, या आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा मूळ शिवसेना राजकीय पक्ष ठरवण्याच्या, आणि शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची पात्रता कायम ठेवण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
