‘तुला पाहते रे’ मध्ये लवकरच होणार राजनंदिनीची एंट्री!
झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ह्या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. विक्रांतची पहिली पत्नी राजनंदिनीची मालिकेत एंट्री कधी होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
मालिकेच्या शीर्षक गीतात सावलीतून दिसणारा हा चेहरा आता सगळ्यांच्या समोर शेवटी आला. अभिनेत्री शिल्पा तुळसकर हि भूमिका साकारत आहे. मालिकेच्या शीर्षकगीतातच राजनंदिनीची झलक पाहायला मिळते. पण आतापर्यंत ती मालिकेत दिसली नव्हती. अभिनेत्री शिल्पा तुळसकर या राजनंदिनीची भूमिका साकारणार आहेत. त्यांनी मालिकेसाठी शूटिंगला सुरुवात केली असून २४ एप्रिलच्या एपिसोडद्वारे त्या प्रेक्षकांना भेटणार आहेत.
मालिकेत सुरू असलेल्या कथेप्रमाणे राजनंदिनीचा मृत्यू झाला असून इशाच्या रुपात तिचा पुनर्जन्म झाला आहे. त्यामुळे राजनंदिनीची भूमिका फ्लॅशबॅकच्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहे. राजनंदिनीचं रहस्य नेमकं काय आहे, तिच्यासोबत काय घडलंय, बंगल्यातल्या बंद खोलीत काय रहस्य दडलं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राजनंदिनी आल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.