डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली
नागपूर: डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेवर सध्या भाजपचं सरकार असून महापौरांनीही प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचे स्वागत केले आहे. तुकाराम मुंढे यांनी ज्या ज्या महानगरपालिकांत आयुक्त म्हणून काम पाहिले तेथे सत्ताधारी गटाशी त्यांचे खटके उडत राहिले. नियमाला धरून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. पाहुयात नागपूर महानगरपालिकेत काय होतं ते.