Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

टेस्ला ची भारतात एंट्री; अभियंत्यांना फुल टू स्कोप

टेस्ला ची भारतात एंट्री; अभियंत्यांना फुल टू स्कोप

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी १३ जानेवारी रोजी अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीने बेंगलुरूमध्ये नवीन कार्यालयाची नोंदणी केली. कंपनीने पहिले ऑफिस बेंगळुरू क्लबच्या समोर रिचमंड सर्कल जंक्शन या ठिकाणी उघडले आहे. कंपनीचं रजिस्ट्ररेशन हे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने करण्यात आले आहे. डेव्हिड जॉन फेनस्टाईन, वैभव तनेजा आणि व्यंकटरंगम श्रीराम यांना सहाय्यक संचालक म्हणून नेमले आहे.

भारतात टेस्लाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, २०२१ मध्ये कंपनी भारतीय बाजारात एन्ट्री करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, कंपनी पुढील वर्षीपासून भारतात आपले कामकाज सुरू करणार आहे. भारत पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक कार उत्पादक देश म्हणून समोर येईल. याचा सर्वात जास्त फायदा अभियंत्यांना असणार आहे. इलेक्ट्रिक वेहिकल इंडस्ट्री ही मल्टी- डीसपिलनरी फील्ड आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनीअर्स सहभागी असतात. केमिकल इंजिनीअर्स हे बॅटरी साठी काम करू शकतात, इलेक्ट्रिकल इंजिनीअर्स हे मोटर, वायर हार्नेसिंगसाठी काम करू शकतात, मेकॅनिकल इंजिनीअर्स हे थर्मल सिस्टम, वेहिकल पार्ट डिझाईन साठी काम करू शकतात. तर मेकाट्रोनिक इंजिनीअर्स
रोबोटिक्स, पॉवर ट्रेन कंपोनेंट्स डेव्हलमेंट साठी काम करू शकतात.

इलेक्ट्रिक कार डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग या फील्ड मध्ये इंजिनियरसला इंजीनियर्सला स्कोप असणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठात ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस डिझाइन करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर ऑनलाईन कोर्सेस पण उपब्धत करण्यात आले आहेत जसे की इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक वेहिकल बाय एनपीटीएल, इंट्रोडक्शन टू बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम बाय कोरसेरा, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक वेहिकल बाय udemy ( Free ) .टेस्ला ची भारतात एंट्री हे आपल्या सर्वांसाठी गर्वाचा क्षण आहे. टेस्ला भारतात येण्याने खूप मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होईल आणि इंजिनीअर्सच्या करियर ला नक्कीच चालना मिळेल.

– इंजी. हनुमंत चव्हाण
( इलेक्ट्रिकल इंजिनीअर् )

“२१ वे शतक हे आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचे युग आहे. भारताने सौर ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करत जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेस्ला भारतात येण्याने औ्योगिक क्षेत्राला गती मिळेल आणि इंजिनीअर्सच्या करियरला बूस्ट.”

-प्रा. डॉ. दिपक कदम
(विद्युत विभाग प्रमुख, मेट(MET) भुजबळ नाॅलेज सिटी, नाशिक

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *