टेनिस कोर्ट ची राणी सेरेना विल्यम्सची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर
२३ ग्रँडस्लॅम जिंकणारी अमेरिकेची अग्रणी टेनिसपटू सेरेना विल्यम्सने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कौटुंबिक कारणांमुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचं एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं.
यावर्षी विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच एकेरी सामन्यात सेरेनाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आता अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धा हे तिचं लक्ष्य असून, हिच तिची अंतिम स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. डब्ल्यू.टी.ए. अर्थात महिला टेनिस संघटनेच्या एकेरी मानांकनात ३१९ आठवडे सेरेना पहिल्या स्थानावर राहिली आहे.