भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानातून पंतप्रधानांनी केले उड्डाण
बंगळुरू, दि. २५: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरु इथल्या कारखान्याला भेट दिली. यावेळी कारखान्यातल्या उत्पादन सुविधा तसंच तेजस जेटची सुविधा आदींचा आढावा घेतला. स्वदेशी एलसीए मार्क टू आणि स्वदेशी अत्याधुनिक मिडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट AMCA चे दोन स्वाड्रन्स यांचं उत्पादन एच ए एल करणार आहे. यासाठी एच ए एलला अमेरिकेची GE ही कंपनी सहकार्य करत आहे अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख विकास कामत यांनी दिली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले.
पंतप्रधानांनी X(ट्विटर) वर त्यांचा अनुभव शेअर केला:
“तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता, आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना मला देऊन गेला.” असे पंप्रधान म्हणाले.
“मी आज तेजसमधून उड्डाण करताना अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आपली मेहनत आणि दृढ निर्धार यामुळे आपण स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासियांचे हार्दिक अभिनंदन.”
