बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परत जाण्याची परवानगी
मुंबई, दि. ७: बृहन्मुंबई महापालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परत जाण्याची परवानगी दिली आहे. पाटण्याचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी गेल्या रविवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आले होते.
मात्र मुंबईत येताच त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारत १५ ऑगस्टपर्यंत विलगीकरणात पाठवलं होतं. मात्र बिहार पोलिसांच्या विनंतीवरून, विलगीकरणाचा काळ पूर्ण होण्याच्या आठवडाभर आधीच त्यांना विलगीकरणातून सोडलं, असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेनं सांगितलं.
दरम्यान, सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज अंमलबजावणी संचालनालय – ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली. ही चौकशी पुढे ढकलण्याची रियाची मागणी ईडीने फेटाळून लावली होती.
