माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या सुर्यकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
मुंबई, दि. २५: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. भविष्यातल्या लढाईसाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असं पाटील यावेळी म्हणाल्या.
१५ ऑगस्ट १९४८ साली जन्मलेल्या सुर्यकांत पाटील यांनी हिंगोली व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी सुर्यकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज अखेर त्यांची एका अर्थी घरवापसी झाली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
