‘फन टाईम विथ फॅमिली’, सुप्रिया सुळेंकडून सोशल मीडियावर ‘हा’ खास फोटो शेअर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीय सुळे यांनी त्यांचा एक फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “फन टाईम विथ फॅमिली” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचे भाचे पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. केवळ सुप्रिया सुळेच नाही तर रोहित पवार यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिघांचा सेल्फी पोस्ट केला, फोटोसह त्यांनी भाऊ पार्थ पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BvCiRzvn6lh/?utm_source=ig_web_copy_link
