अरेरे..महाराष्ट्र उन्हाने होरपळतोय
गुरुवारी राज्यातील दहा वर्षातील सर्वात उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. गुरुवारी मुंबई शहरात ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. तर पुणे शहरात ४३ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले.
मुंबईसह राज्यातील अनेक शहरात गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ होत आहे़. पुढील दोन दिवसात राज्यात तापमान वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने पुन्हा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात सोसावे लागत आहे. मे महिन्यातही मुंबईकरांना ऋतुमानानुसार उन्हाचा आणि वाढत्या आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे.
