कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द
नागपूर, दि. २४: नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयानं रद्द केली आहे. सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधीच्या घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून त्यांना ५ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसंच साडेबारा लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे.
