पहा : जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन यांचा अभिनंदन यांना अनोखा सॅल्यूट !
जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथे एक वाळू शिल्प साकारले आहे. त्यात ते आज मायदेशी परतणारे पाकिस्तानच्या ताब्यातील हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्थमान यांचे सॅल्यूट ने स्वागत करत आहेत. ह्या शिल्पात त्यांनी मिग – 21 विमानाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. सुदर्शन यांच्या या अनोख्या अभिवादाना नेटिझन्स कडून कौतुकाची सलामी मिळत आहे.
