परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने काढली निकाली
मुंबई, दि.३: दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. परीक्षा घ्यायची किंवा नाही, परीक्षेसाठी परिस्थिती अनुकूल आहे किंवा नाही हे सरकारचे धोरणात्मक निर्णय असतात.
न्यायालयाचे आदेशाने परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षांर्थींचे नुकसान झाले तर जबाबदारी कोण घेणार असा सवाल मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सुनावणी दरम्यान केला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन याचिकाकर्ते धनजंय कुलकर्णी यांनी सादर केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली.
११ वी प्रवेशाच्या वैकल्पिक सीईटीसाठी सर्वच बोर्डाचे विद्यार्थी पात्र असल्याची ग्वाही सरकारने दिलेली आहे. हे देखील न्यायालयाने गृहित धरले.
मात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करण्याविषयी काढण्यात आलेल्या शासन आदेशाला स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान देण्याची मुभा मात्र न्यायालयाने दिली आहे.
