उदया जाहीर होणार दहावीचा निकाल
मुंबई, दि. १: राज्य शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मधे घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा म्हणजेच दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या २ जून रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची आकडेवारी ऑनलाईन पाहता येईल आणि तिची प्रत छापून घेता येईल.
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील. गुणपडताळणीसाठी ३ जून पासून १२ जूूनपर्यंत तर उत्तपत्रिकेची छायाप्रत हवी असल्यास ३ जूनपासून २२ जून पर्यंत अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेतून १४ जून रोजी दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येतील.
Source – AIR
