शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकांची एकत्रित सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
मुंबई/नवी दिल्ली, दि. ९: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत जयंत पाटील यांची याचिका आणि उद्धव ठाकरे यांची याचिका एकत्र करण्याचो निर्देश सर्वोच्च न्यायलयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज हे निर्देश दिले.
विधानसभा अध्यक्षांना जुलै महिन्यात निवेदन दिल्यानंतर दोनदा स्मरणपत्र पाठवुनही फुटीर आमदारांना अध्यक्षांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं नाही, असा आरोप या निवेदनात करण्यात आला होता. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगा समोर या संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीचा उल्लेख या बाबत पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे.
Source – AIR
