Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईत ‘एसआरए’कडून सर्व झोपडपट्टयांमधल्या झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरूवात

मुंबईत ‘एसआरए’कडून सर्व झोपडपट्टयांमधल्या झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणास सुरूवात

मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मुंबईतल्या सर्व झोपडपट्टयांमधल्या झोपडीधारकांचं बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू आहे. झोपडीधारकांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जातं. यात कोणत्याही विकासकाचा किंवा संस्थेचा संबंध नाही, असं निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलं आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील १० अधिकाऱ्यांची ‘सक्षम प्राधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

हे सक्षम प्राधिकारी त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील सर्वेक्षणासाठी किमान ७ दिवस आधी जाहीर सूचना प्रसिध्द करतात. त्यानुसार नमुद केलेल्या दिवशी झोपडपट्टयांमध्ये जाऊन झोपडपट्टयांचं ड्रोन सर्वेक्षण आणि बायोमेट्रीक सर्वेक्षण करतात. झोपड्पट्टीधारकांनी आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला सहकार्य करावं, असं आवाहन प्राधिकरणाने केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *