Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा मंत्रालयाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंसोबत अभिनव उपक्रम

देशातल्या २६ शाळांमध्ये मीट अ चँपियन या उपक्रमाचं आयोजन

मुंबई/नवी दिल्ली, दि. २९: आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. यानिमित्तानं देशातल्या २६ शाळांमध्ये मीट अ चँपियन या उपक्रमाचं आयोजन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती निखत झरीन, पॅरालिम्पिक आणि राष्ट्रकुल पदकविजेती भावीना पटेल, टोकियो ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेता मनप्रीत सिंह यांच्यासह इतर खेळाडू या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा यानं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात शाळांना भेटी देण्याच्या या मोहिमेची सुरुवात केली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये ही मोहीम देशाच्या विविध भागांमध्ये पोहोचली. या शाळाभेटीदरम्यान हे विजेते विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगतात, आयुष्याचे धडे, योग्य आहाराच्या सूचना देतात आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान क्रीडा आणि फिट इंडिया मोहिमेतल्या काही प्रतिनिधींसोबत आज संध्याकाळी दूरस्थ पद्धतीने संवाद साधणार आहेत. निरोगी जीवनाचं आणि क्रीडाक्षेत्राचं भारतातलं महत्त्व यावर ते चर्चा करतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *