Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी राज्य क्रीडा विभागाचे आवाहन

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी राज्य क्रीडा विभागाचे आवाहन

मुंबई: खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” चा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा  प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मूळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधित उमेदवार व संबंधित क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले असल्याचे मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *