आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत दक्षिण मध्य रेल्वेच्या पाच विशेष रेल्वे गाड्या धावणार
आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेने आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत पाच विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद ही रेल्वे आजपासून तर धर्माबाद-मनमाड-धर्माबाद ही रेल्वे उद्यापासून औरंगाबादमार्गे धावेल, काचीगुडा-अकोला-काचीगुडा ही रेल्वे २६ ऑक्टोबरपासून दर सोमवारी काचीगुडाहून आणि दर मंगळवारी अकोलाहून नांदेड, पुर्णा, हिंगोली मार्गे धावणार आहे आणि काचीगुडा-नारखेड ही रेल्वे आजपासून आठवड्यातून सहा दिवस हिंगोली, अकोला, अमरावती मार्गे धावणार आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने या सर्व गाड्या आरक्षित असणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने कळवले आहे.
