माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
नाशिक, दि. ११: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह पूजा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आ. अनिल देशमुख, आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री व आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, माजी खासदार व पक्षाचे मराठवाडा समन्वयक जयसिंगराव पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, विधान परिषदेच्या माजी आ. विद्या चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.