२० लाख मे. टन कच्च सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल आयात करण्यास केंद्र सरकारची परवानगी
केंद्रानं सीमाशुल्क तसंच कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरातून सूट देत दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येकी २० लाख मेट्रिक टन कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल आयात करण्याची परवानगी दिली आहे. यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आजपासून ही सूट लागू होत असून आर्थिक वर्ष २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी शुल्कमुक्त आयात लागू होईल असं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आलं आहे. ही सूट दिल्यामुळे देशांतर्गत किमती कमी होण्यास आणि महागाई नियंत्रणात आणण्यास मदत होईल.
